Sharad Pawar : निकालाला काहीच तास शिल्लक अन् शरद पवारांकडून मोठा दावा; म्हणाले, ‘काळजी करू नका, राज्यात…’
शरद पवारांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उपस्थितीत होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचे म्हणत शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीचा मोठा दावा केला आहे.
विधानसभा निवडणूक निकालाची उत्सुकता राजकीय नेते, कार्यकर्त्यांनाच नाही तर सर्वसामान्यांनाही लागली आहे. त्यातच आता शरद पवारांनी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उपस्थितीत होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचे म्हणत शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच मोठा दावा केला आहे. इतकंच नाहीतर महाविकास आघाडीच्या १५७ जागा निवडून येणार असा विश्वास शरद पवारांकडून व्यक्त करण्यात आला. आज शरद पवार गट राष्ट्रवादीची ऑनलाईन बैठक झाली त्या बैठकीत काही काळजी करू नका, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट राष्ट्रवादीच्या उमेदवारांची आज दुपारी तातडीची ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. यावेळी उमेदवारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आहे. शरद पवारांनी सर्व उमेदवारांना विधासनभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन थेट मुंबई गाठा, अशीही सूचनाही दिली.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
Sunil Tatkare : शशिकांत शिंदेंच्या लेखावर सुनील तटकरेंकडून आक्षेप!

