Palghar | शिवलिंगावर दूध न ओतता गरजूंना दूध वाटप, पालघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अनोखा उपक्रम
पालघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने हा अनोखा उपक्रम राबविला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंगणवाडी शाळांमधील लहान मुलांना दुधांच्या पिशव्यांचे वाटप केले. दरवर्षी श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक केला जातो. तर दुसरीकडे अनेक लहान मुलांना पिण्यासाठी दूध मिळत नाही. यामुळे महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करण्याऐवजी लहान मुलांना या दुधाचे वाटप केल्यास पुण्य मिळेल अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
पालघर : सध्या श्रावण मास(Shrawan) सुरु झाला आहे. श्रावणी सोमवारच्या(Shrawani Somwar) दिवशी महादेवाची पूजा केली जाते. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी शिवलिंगावर(Shivlinga) दूधाचा अभिषेक केला जातो. मात्र, पालघर मध्ये राष्ट्रवादीने विशेष उपतक्रम राबवला आहे. शिवलिंगावर दूध न ओतता गरजूंना दूध वाटप करण्यात आले. पालघरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने हा अनोखा उपक्रम राबविला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अंगणवाडी शाळांमधील लहान मुलांना दुधांच्या पिशव्यांचे वाटप केले. दरवर्षी श्रावणी सोमवारच्या दिवशी महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक केला जातो. तर दुसरीकडे अनेक लहान मुलांना पिण्यासाठी दूध मिळत नाही. यामुळे महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करण्याऐवजी लहान मुलांना या दुधाचे वाटप केल्यास पुण्य मिळेल अशी भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. पालघर मधील नागरीकांचे या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

