Nashik Flood | ठेकेदारच्या निष्काळजीपणामुळे अत्यावश्यक सेवेसाठी नागरिकांचा जीवघेणा प्रवास
नाशिकच्या सुरगाण्यांमध्ये पावसाने हाहाकार घातला असून, नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. सन 2022 मध्ये जामुनपाडा गावाला जोडणाऱ्या तान नदीवर कमी उंचीचा पुल निष्कासित करून नवीन पुलाचे काम चालु केले होते.
नाशिकच्या सुरगाण्यांमध्ये पावसाने हाहाकार घातला असून, नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. सन 2022 मध्ये जामुनपाडा गावाला जोडणाऱ्या तान नदीवर कमी उंचीचा पुल निष्कासित करून नवीन पुलाचे काम चालु केले होते. परंतु ठेकेदारच्या निष्काळजीपणामुळे पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण होऊ न शकल्यामुळे.जामुनपाडा- खांदुर्डी गावातील ग्रामस्थांना बाजार,दवाखाना,शाळेत व इतर अत्यावश्यक सेवेसाठी पुराच्या पाण्यातून असे शर्तीचे प्रयत्न करून नदी पार करावी लागत आहे.पाऊस कमी होताच नदीवर अपूर्ण असलेल्या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातून सध्या 3400 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे..परिणामी गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे..त्यामुळेच पावसाचा जोर कायम राहिल्यास,यंदाच्या मोसमात चौथा पूर गोदावरीला येऊ शकतो
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

