नारायण राणे लोकसभा निवडणूक लढणार? निलेश राणे यांची काय प्रतिक्रिया?
नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही यावर निलेश राणे म्हणाले, नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार अशी कोणीतरी...
नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार की नाही यावर निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे लोकसभा निवडणूक लढवणार अशी कोणीतरी मुद्दाम बातमी पेरली आहे. पक्ष देईल तोच उमेदवार असेल. नारायण राणे यांनी उमेदवारी मागितल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही आणि ते मागणार ही नाहीत, असे कुडाळ येथील एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना निलेश राणे यांनी म्हटले आहे.
तर २०२४ मध्ये भाजपला न भूतो न भविष्यती असा रिझल्ट मिळणार असल्याचे भाकितही निलेश राणे यांनी वर्तविले असून ते म्हणाले, सर्वच भारतीय जनता पक्षाकडे वळत आहेत, २०२४ पर्यंत खरं चित्र दिसेल. उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिलेली शिवसेना ही किरकोळ राहिलेली शिवसेना आहे. २०२४ पर्यंत ती शिवसेना नावारूपाला तरी राहणार की नाही? याची शंका आहे. त्यामुळे 2024 पर्यंत शतप्रतिशत भाजप, अशीच पावलं आम्ही टाकणार आहोत. 2024 मध्ये भाजप पक्षाला न भूतो न भविष्यती असा रिझल्ट महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या संख्येत दिसेल, अशी प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.
Published on: Jan 23, 2023 03:26 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
