मिलिंद नार्वेकर तिकीट विकणारा एजंट, निलेश राणे यांचा घणाघात
मिलींद नार्वेकर यांच्यावर निलेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर यांना बसायला जागा नसायची.ते मागे उभे असायचे. शिवसेनेत तिकिट विकणारा जर कोण एजंट असेल तर तो मिलिंद नार्वेकर, अशा शब्दात त्यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे.
मिलींद नार्वेकर यांच्यावर निलेश राणे यांनी घणाघाती टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर यांना बसायला जागा नसायची.ते मागे उभे असायचे. शिवसेनेत तिकिट विकणारा जर कोण एजंट असेल तर तो मिलिंद नार्वेकर, अशा शब्दात त्यांनी नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. तसेच नारायण राणे यांनी मिलींद नार्वेकरांना फोन केल्याच्या ट्विटला उत्तर देताना, साहेबांनी फोन केलाही असेल तर काय अडचण आहे का? उद्धव ठाकरे हे काय़ पाकिस्तानचे आहेत का? फोन करण्यात काय चुकलं? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच मेन कलाकार बघून घेतील, हे साईड अॅक्टरचे काम नाही, असा टोलाही त्यांनी नार्वेकरांना लगावला आहे.
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

