Union Budget 2025 : यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त-काय महाग? बघा एकाच व्हिडीओमध्ये….
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरे पूर्ण अर्थसंकल्प असून निर्मला सीतारामण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामण यांनी अनेक निर्णय जाहीर केल्याचे पाहायला मिळाले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरे पूर्ण अर्थसंकल्प असून निर्मला सीतारामण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामण यांनी अनेक निर्णय जाहीर केल्याचे पाहायला मिळाले. कृषी क्षेत्र, उद्योग, शिक्षण अशा विविध क्षेत्रांसाठी काही महत्वाच्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासोबतच ऑटोमोबाईल क्षेत्रालाही मोठी भेट दिली आहे, ज्यामध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आली आहे. तर आरोग्य क्षेत्राला चालना देण्यासाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कॅन्सरची औषधे स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासोबत टीव्ही, मोबाईल, औषध आणि इलेक्ट्रिक कार, एलईडी, एलसीडी टीव्ही , चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून केली. तर 36 जीवनावश्क औषधांना करामध्ये सूट जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कॅन्सरची औषधं स्वस्त होणार असून कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे. यासोबत चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहे. तर आयात केलेल्या मोटारसायकली, इंटरॅक्टिव्ह फ्लॅट्स, पॅनेल डिस्प्ले आणि प्रीमियम टीव्ही महाग होणार असल्याचे म्हटले.

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले

संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस

वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख

आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
