सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट ओढल्यानंतर त्याच्या खालचा भाग फेकून दिला जातो. त्यालाच इंग्रजीत सिगारेट बट्स असं म्हणतात. याच टाकाऊ बट्सपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची कल्पना नोएडातील भावंडांनी सत्यात उतरवून दाखवली आहे.
टाकाऊपासून अनोख्या टिकाऊ वस्तू बनवल्याचं आपण अनेकदा पाहतो. मात्र सिगारेट बट्सपासून काहीतरी टिकाऊ बनू शकेल, असा तुम्ही कधी विचार केलाय का? ही अशक्य वाटणारी गोष्ट नोएडामधील दोघा भावंडांनी शक्य करून दाखवली आहे. सिगारेट्सच्या बट्सपासून या भावंडांनी चक्क टेडी बेअर, घरातील सजावटीच्या वस्तू, ॲक्सेसरीज आणि अगदी मॉस्किटो रेपलंटसुद्धा बनवलंय. कोड एफर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक नमन गुप्ता आणि त्यांचा भाऊ विपुल गुप्ता यांनी ही संकल्पना सत्यात उतरवून दाखवली आहे. “तरुणांशी संबंधित उत्पादनं बनवून आम्ही एकप्रकारे त्यांना याचीही जाणीव करून देतोय की सिगारेट्स बुट्समुळे वातावरण किती प्रदूषित होतं? माणुसकीच्या दृष्टीकोनातून एकत्र काम केलं तर ही समस्या सोडवण्यासाठी आपण या सिगारेट बट्सचा पुनर्वापर करू शकतो”, असं नमन गुप्ता सांगतात.
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात

