पंढरपुरातील विठुरायाच्या गाभाऱ्यात सुंदर अन् आकर्षक फुलांची आरास, बघा विठ्ठल-रूक्मिणीचं रूपडं
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाल आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांनी आकर्षक सजावट केली आहे. ही सजावट बीड येथील विठ्ठलभक्त करण पिंगळे यांच्याकडून करण्यात आली आहे. या सजावटीसाठी जवळपास 2 टन लाल पिवळ्या झेंडूच्या फुलांचा वापर
पंढरपूर, १२ नोव्हेंबर २०२३ | राज्यभरासह देशभरात दीपावलीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाल आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूच्या फुलांनी आकर्षक सजावट केली आहे. ही सजावट बीड येथील विठ्ठलभक्त करण पिंगळे यांच्याकडून करण्यात आली आहे. या सजावटीसाठी जवळपास 2 टन लाल पिवळ्या झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.आज लाल, पिवळ्या झेंडू फुलांच्या सजावटीने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे रूप खुलले आहे. पुष्प सजावटीत विठ्ठल गाभारा, रूक्मिणी गाभारा, सोळखांबी, बाजीराव पडसाळी, प्रवेशद्वार या ठिकाणी फुलाची सजावट केल्याने मंदिर अधिकच आकर्षक दिसत आहे. या सजावटीसाठी फक्त लाल आणि पिवळ्या रंगाचे झेंडूचे फुल वापरल्याने संपूर्ण मंदिर लाल पिवळ्या रंगाने न्हाऊन निघाल्याचे पाहायला मिळतंय.





