tv9 Marathi Special Report | महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शासकीय फलक आणि नोटिसा गुजराती भाषेत लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. जमीन, रस्ते आणि पोलिस यंत्रणा महाराष्ट्राची असताना प्रशासनाकडून गुजराती फलक लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. रस्ते वाहतुकीच्या सूचनांसह स्थानिक शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसाही गुजराती भाषेत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शासकीय फलक आणि नोटिसा गुजराती भाषेत लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. जमीन, रस्ता, पोलिसांसह सगळी यंत्रणा महाराष्ट्राची असताना फलक मात्र गुजरातीतून लागल्यानं पालघर जिल्हापरिषद वादात आली आहे. रस्ते वाहतुकीच्या फक्त सूचनाच नव्हे तर त्या भागातील शेतकऱ्यांना नोटीस देखील गुजरातीतून मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. ‘महाराष्ट्रातच गुजरातचा फील देण्याची किमया’ पालघरच्या थोर प्रशासनाने केली आहे. पालघर जिल्हा प्रशासनाला सध्या गुजराती प्रेमाचं भरतं आलंय अशी टीका विरोधकांनी केली आहे.