Pankaja Munde Live | आधीच उपाशी त्यात उपवास अशी ओबीसींची स्थिती, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा काढला तर काही षडयंत्री मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात, अशा शब्दात ओबीसी आरक्षणात खो घालणाऱ्यांवर पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला. ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा काढला तर काही षडयंत्री मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात, अशा शब्दात ओबीसी आरक्षणात खो घालणाऱ्यांवर पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांनी कुणाचेही नाव न घेता हा हल्ला चढवला. त्यामुळे त्यांनी नेमका कुणावर निशाणा साधला याची जोरदार चर्चा रंगली आहे.

औरंगाबाद येथे विभागीय ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंकजा मुंडे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. आता एक नवीन षडयंत्र सुरू झालं आहे. बहुजनांची व्याख्या खराब करण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे. इकडे ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न कुणी तरी उचलला की तिकडे षडयंत्रकारी लोक मराठा समाजाच्या आरक्षणाच मुद्दा काढतात. अरे मराठा समाजाच्या पाठित खंजीर खुपसणाचं काम तुम्हीचं केलं, असा घणाघाती हल्ला चढवतानाच ज्या मुख्यमंत्र्यांची जात तुम्ही काढत होतात त्यांनीच मराठा समाजला आरक्षण दिलं. मात्र, या सरकारने ते आरक्षणही संपुष्टात आणलं, अशी जोरदार पंकजा यांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI