पंकजा मुंडे खरंच मोठा राजकीय निर्णय घेणार? करुणा मुंडेंच्या एका विधानानेच उडवली खळबळ
भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी 'रिटायर व्हावसं वाटतं', असं विधान केलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. काँग्रेसने तर पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली आहे.
भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘रिटायर व्हावसं वाटतं’, असं विधान केलं आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांच्या विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. काँग्रेसने तर पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली आहे. त्यावर पंकजा मुंडे यांची अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या आधी एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, “कंटाळा आलाय… राजकारणातून रिटायर्ड व्हावसं वाटतं. पण तुमचा सर्वांचा उत्साह बघून मी पुन्हा नव्या जोमाने काम करते”
या सर्व घडामोडींवर करुणा मुंडे यांनी सुचक विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, येणारा काळ काँग्रेसचा आहे; महत्त्वाचं म्हणजे या पक्षात बरेच जण आहेत जे मुख्यमंत्री होऊ शकतात. त्यासाठी पंकजा ताईंची गरज नाही… मला तर असं वाटतं की त्या राजकारण सोडतील पण भाजप सोडणार नाहीत.
Published on: Aug 03, 2026 03:57 PM
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...

