अजित पवारांची खूप आठवण येतेय; पार्थ पवारांचं भावनिक ट्विट
पार्थ पवार यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचे दिवंगत वडील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढली. हा क्षण केवळ राजकीय टप्पा नसून मोठी जबाबदारी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वडिलांनी घालून दिलेल्या जनसेवेच्या आणि विकासाच्या राजकारणाच्या मूल्यांना पुढे नेण्याचा संकल्प पार्थ पवार यांनी यावेळी केला.
पार्थ पवार यांनी नुकताच राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी त्यांनी आपले दिवंगत वडील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आठवण काढली. अजित पवार आज असते, तर ते खूप आनंदी झाले असते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. ही उमेदवारी केवळ राजकीय टप्पा नसून मोठी जबाबदारी असल्याची जाणीव असल्याचे पार्थ पवार यांनी नमूद केले. दिवंगत अजित पवारांनी आयुष्यभर जनतेच्या सेवेला प्राधान्य देत विकासाचे राजकारण केले. त्यांनी दिलेले संस्कार आणि जनतेशी जपलेली नाळ, प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची तळमळ ही मूल्ये पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे पार्थ पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
या दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई यांनी दिवंगत अजित पवारांच्या कथित विमान अपघात चौकशीबाबत प्रतिक्रिया दिली. दोन तपास यंत्रणा चौकशी करत असून, अहवालातील ठळक मुद्दे मंत्रिमंडळासमोर आल्यानंतरच भाष्य करू असे त्यांनी स्पष्ट केले. सत्य परिस्थिती बाहेर येणे महत्त्वाचे असल्याचेही देसाई म्हणाले.
Published on: Mar 06, 2026 10:23 AM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
