देशभरात 10 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलची तिसऱ्यांदा दरवाढ, किती रुपयांवर गेला आकडा?
इस्त्रायल – इराण आणि नंतर अमेरिका – इराण संघर्षामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या तणावाचा परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधन दर सातत्याने वाढत आहेत.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांतील ही तिसरी दरवाढ असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. ताज्या दरांनुसार पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महागले आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलपंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत.
इस्त्रायल – इराण आणि नंतर अमेरिका – इराण संघर्षामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या तणावाचा परिणाम आता भारतीय अर्थव्यवस्थेवरही दिसू लागला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने इंधन दर सातत्याने वाढत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे सरकार इंधनाचा उपलब्ध पुरवठा असल्याचं सांगत आहे. अनेक नागरिक इंधनाचा साठा करत आहेत. त्यामुळे हे संकट आणखी बिकट होत चाललं आहे.
RBI ने देखील महागाईबाबत गंभीर इशारा दिला आहे. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास देशात महागाईची दुसरी लाट येऊ शकते, असे RBI ने स्पष्ट केले. इंधन दरवाढीमुळे वाहतूक, मालवाहतूक आणि दळणवळण खर्च वाढणार असून त्याचा थेट परिणाम सर्व वस्तूंच्या किंमतींवर होणार आहे. आयात-निर्यात महागल्याने पुरवठा साखळीवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे.
Published on: May 23, 2026 10:47 AM
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब

