PM Modi Voting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ९३ लोकसभा मतदारसंघात आज लोकसभेची निवडणूक पार पडतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. कुठे केलं मतदान?

PM Modi Voting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
| Updated on: May 07, 2024 | 11:31 AM

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडतंय. १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून एकूण ९३ लोकसभा मतदारसंघात आज लोकसभेची निवडणूक होतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबाद येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये जाऊन नरेंद्र मोदींनी आपलं मतदान केलं. लोकशाहीच्या मोठ्या उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. गांधीनगर येथील मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये एकूण २५ जागा आहेत. त्यापैकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे २४ जागांसाठी आज लोकसभेचं मतदान होतंय. ‘आजच्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी ट्वीटद्वारे केले. तर आपल्या सक्रीय सहभागामुळे निवडणूका अधिक चैतन्यमयी होतील, असेही मोदींनी मतदारांना सांगितले.

Follow us
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब
ही भाषा नको, नेहमी छगन भुजबळांचं का ऐकून घ्यावं? राणेंचा करारा जवाब.
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले
या निवडणुकीत काय होणार? ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही; दादा काय म्हणाले.
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?
या नशेडी व्यवस्थेत एका आमदाराचा मुलगा होता, नाना पटोलेंचा रोख कुणावर?.
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप
सुप्रिया सुळेंमुळे लोक पक्ष सोडताय, तरुण महिला नेत्याचे गंभीर आरोप.
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण...
'ससून'च्या रक्त चाचणी विभागातील एका कर्मचाऱ्यानं ठोकली धूम, कारण....
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?
शिंदे जाणार? राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार?संजय शिरसाटांच उत्तर काय?.
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात..
बापाची जिद्द कायम, इयत्ता 10 वीत 10 वेळा नापास, पण 11 व्या प्रयत्नात...
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?
400 पार की तडीपार? महायुतीला किती जागा? अनिल थत्तेंची भविष्यवाणी काय?.
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट
माथेरानला जाण्याच प्लान करताय? तुमच्यासाठी आनंदाची बातमी, येत्या ऑगस्ट.
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल
रेमलचा मान्सूनवर परिणाम नाही, 'या' तारखेपर्यंत पाऊस महाराष्ट्रात दाखल.