Kabutar Khana : तो लालबागवरून आला अन् म्हणाला आणखी 12 गाड्या येणार… कबुतरांना खाद्य देणाऱ्याची मुजोरी तर बघा, VIDEO व्हायरल
मुंबईतील कबुतरखान्यांवर उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, या कारणास्तव कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी दाणा-पाणी देण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून अनेक ठिकाणी कबुतरखाने बंद केल्याचे पाहायला मिळत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील जे कबुतरखाने बंद केले ज्यामध्ये दादर कबुतरखान्याचा देखील समावेश आहे. हा कबुतरखाना बंद केल्यानंतर मुंबईतील काही नागरिकांसह विशेषतः जैन समुदाय चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाला. गेल्या आठवड्यातच जैन समाजाकडून या निर्णयाच्या विरोधात आक्रमक आंदोलन केल्याचे पाहायला मिळाले. असे असतनाही न्यायालयाने कबुतराखाना बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. असे असताना काही नागरिकांकडून हा नियम मोडण्यात येतोय. अशातच दादर कबुतरखान्याचा जवळचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
या व्हिडीओमधून असं दिसतंय की मुंबईतील लालबाग येथून एक व्यक्ती आपली कार घेऊन आला आणि त्या कारच्या छतावर त्याने कबुतरांना दाणे ठेवण्याचे दिसतंय. हा व्यक्ती लालबागचा असून तो कबूतरांना खाद्य-दाणे देण्यासाठी दादरला आला. यावेळी त्याला स्थानिक नागरिकांना अडवलं असता त्याची मुजोरी पाहायला मिळाली. कबुतरांना खाद्य देण्यासाठी आणखी १२ गाड्या येणार असल्याचे म्हणत काही करायचं ते करा, अशी भाषा या व्यक्तीची व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
Published on: Aug 09, 2025 10:27 AM
कॉंग्रेसमध्ये मोठं भगदड! शिंदेच्या पक्षातील इनकमिंग सुरुच, 10 नगरसेवाक
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
