AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Madhuri In Vantara :  काजू-बदाम, मिठाई, फळे अन् बरंच काही... वनताराच्या मेगा किचनमध्ये हत्तींसाठी काय काय? मेन्यू एकदा बघाच!

Madhuri In Vantara : काजू-बदाम, मिठाई, फळे अन् बरंच काही… वनताराच्या मेगा किचनमध्ये हत्तींसाठी काय काय? मेन्यू एकदा बघाच!

| Updated on: Aug 07, 2025 | 5:25 PM
Share

वनतारातील मेगा किचनमध्ये तयार होणारे पदार्थ हे हत्तींच्या आरोग्याची आणि त्यांच्या गरजांची विशेष काळजी घेऊन बनवले जातात.

गुजरातच्या प्राणी संवर्धन प्रकल्प वनतारामध्ये सध्या २६० हून अधिक हत्ती-हत्तीणींचं पालनपोषण आणि संगोपण केले जात असल्याची माहिती मिळतेय. हत्तींच्या आरोग्याची नियमित तपासणी करणं, काही आजार असल्यास, आवश्यकतेनुसार लेझर थेरपी, एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड सारख्या अत्याधुनिक सुविधांनी उपचार देणे, प्रत्येक हत्तीच्या वयानुसार, आरोग्याच्या स्थितीनुसार आणि गरजेनुसार त्यांच्यासाठी खास आहार देण्याची व्यवस्था देखील वनतारा येथे असल्याचे पाहायला मिळत आहे. वनतारा येथे टीव्ही ९ मराठीची टीम देखील यासंदर्भात माहिती घेण्यासाठी दाखल झाली आहे.

हत्ती आणि वनताराबद्दल जाणून घेताना टीव्ही ९ मराठी वनताराच्या मेगा किचनमध्ये पोहोचलं जिथं गेल्यानंतर हत्तींसाठी विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ तयार होत असल्याचे पाहायला मिळाले. वनतारा येथील हत्तींच्या आहाराची विशेष काळजी घेतली जाते आणि यासाठी एक पोषणतज्ञ टीम काम करते. हत्तीच्या आहारात काजू, बदाम यासारख्या सुक्या मेव्यासह गुळ, फळ, हिरवा पालेभाज्या, कंदमुळं, मक्याची कणसं यासह हिरवा चारा अशा गोष्टींचा समावेश आहे.

८० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या हत्तींना किंवा ज्यांना दातांनी चावणे शक्य नाही, अशा हत्तींना फळांचे ज्यूस दिले जातात. हत्तींच्या रोजच्या आहारात पौष्टिक खिचडीचा समावेश असतो. जेव्हा हत्तींना औषध दिले जाते किंवा त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात, तेव्हा त्यांना ‘ट्रीट’ म्हणून पॉपकॉर्न दिले जातात. त्तींसाठी खास भाकरी बनवली जाते, जी त्यांच्या आरोग्यासाठी योग्य असते. हिमाचल प्रदेशातून आणलेली रसाळ सफरचंद आणि इतर अनेक प्रकारची फळे हत्तींना खाऊ घातली जातात.

Published on: Aug 07, 2025 05:25 PM