Pune : दौंडच्या कला केंद्रात नर्तकीवर गोळीबार? ‘तो’ आमदार बंधू कोण? रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
दौंडमधल्या एका कला केंद्रात सत्ताधारी आमदारच्या भावाने गोळीबार केल्याचा आरोप होतोय. धक्कादायक म्हणजे या गोळीबारात कला केंद्रामधील एक तरुणी जखमी झाल्याचा दावा केला जातोय. सुरुवातीला याबद्दल गुप्तता बाळगणाऱ्या पोलिसांनी आता तीन जणांवर याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे.
मारहाण, दमदाटी, शिवीगाळ आणि गुंडागर्दी यानंतर आता सत्तेतील एका आमदाराचा भाऊ गोळीबारानं वादात आलाय. आरोपानुसार पुण्यातल्या एका सत्ताधारी आमदाराचा भाऊ दौंड जवळच्या एका कला केंद्रामध्ये गेला. महिला कलाकारांचं नृत्य सुरू झालं. मात्र गाण्यावरून दोन गटात वाद होताच आमदाराच्या भावाने बेधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे. त्यामध्ये एक तरुणी जखमी झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे कला केंद्राचे मालक असा कोणताही प्रकार घडलाच नाही असं म्हणताय. मात्र दुसरीकडे त्याच कला केंद्रामध्ये चौकशीसाठी पोलिसांचं पथकही पोहोचलं आणि गोळीबार प्रकरणी तीन जणांवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. सकाळपर्यंत पोलिस गोळीबार झाल्याच्या घटनेला दुजोरा देत नव्हते. मात्र अखेर तिघांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे गोळीबाराला दुजोरा मिळाला आहे. मात्र पुढे कारवाई होईल की नाही याबद्दल विरोधकांनी शंका व्यक्त केली आहे.
रोहित पवार यांच्या आरोपानुसार पोलीस यंत्रणा सत्ताधारी दबावमुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करते. हा कसला सत्तेचा तमाशा? अनंत कटकटी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी असा ट्वीट रोहित पवार यांनी केला. यामध्ये अनंत कटकटी म्हणजे नेमक्या कोणत्या आमदाराचा भाऊ यावरून तर्क वितर्क सुरू आहेत. दौंडच्या भागांमध्ये तीन कला केंद्र आहेत. कला केंद्रामध्ये गाणी, नृत्य, लावणी अशा विविध कला सादर केल्या जातात. ग्रामीण भागातील कलावंतांना कलेची सेवा आणि रोजगार मिळावा या हेतून कला केंद्र चालवली जातात. मात्र काही ठिकाणी कलेच्या नावावर बेभान प्रकार सुरू असल्याचेही आरोप होताहेत.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

