Prasad Tamdar : महिलांना आंघोळ, भक्तांसोबत लैंगिक चाळे अन् बरंच काही.. भोंदू बाबाचे कारनामे, हजाराहून अधिक नग्न VIDEO समोर
अंग चोळून घेणार्या पुण्यातील भोंदू बाबाच्या मठातील नंगानाच पाहून महाराष्ट्र हादरलेला आहे. अशातच या बाबाचे १ हजाराहून अधिक नग्न व्हिडीओ समोर आले आहेत.
पुण्यातील वादग्रस्त भोंदू बाबा प्रसाद तामदारचे अनेक कारनामे दिवसेंदिवस उघड होत आहेत. प्रसाद तामदारचे एक हजाराहून अधिक नग्न व्हिडीओ समोर आले आहेत. ८ पेनड्राईव्ह आणि अनेक लॅपटॉप पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. भोंदू बाबा प्रसाद तामदार हा सध्या पिंपरी पोलिसांच्या ताब्यात आहे. श्रद्धेच्या आडून भाविकांचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या या बाबाचं पितळ नुकतंच उघडं पडलं होतं. या बाबाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर चौकशी दरम्यान एक-एक धक्कादायक माहिती उघड होतेय. पुण्यात प्रसाद तामदार याने हायटेक कारनाम्यांनी श्रद्धेचा बाजार मांडला आहे. पुण्यातील मुळशी तालुक्यातील सुस गावातील स्वामी समर्थ बिल्डिंगमध्ये त्याचा मठ आहे. हा बाबा महिला भक्तांसोबत नाचायचा. अंग चोळून अंघोळ करायचा. भक्तांशी समलैंगिक संबंध ठेवायचा. अनेक महिलांना आंघोळ घालताना, त्यांच्यासोबत विचित्र डान्स करताना, महिलांची ओटी भरतानाचे या भोंदू बाबाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

ना हनी, ना ट्रॅप..; हनीट्रॅपवर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया

सगळे आमदार माजले... फडणवीसांनी भर सभागृहात कोणाला फटकारलं?

बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस; शेतांना आलं तळ्याचे स्वरूप

मुलीला गलिच्छ शिव्या, आव्हाडांच्या पत्नीनं सांगितलं संपूर्ण प्रकरण
