AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होणार, मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये

Devendra Fadnavis | पुणे हादरलं: चिमुरडीवरील अत्याचारानंतर हत्या; नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा होणार, मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये

| Updated on: May 02, 2026 | 2:20 PM
Share

पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अवघ्या दीड तासात अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी 65 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अवघ्या दीड तासात अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. मुलगी दुपारी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. सायंकाळी साडेचार वाजता पोलिसांत तक्रार दाखल होताच तत्काळ शोधमोहीम राबवण्यात आली आणि सुमारे 5:15 वाजता आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आरोपीला लवकर पकडण्यात यश आले.
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेला उत्तर देत म्हणाले, “अशा संवेदनशील घटनेत राजकारण करणे अत्यंत अयोग्य आहे. काही गोष्टींमध्ये संवेदनशीलता आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. तसेच, आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवले जाईल आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, म्हणजेच मृत्युदंडाची मागणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

Published on: May 02, 2026 02:20 PM
Follow Us