AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा

सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली… पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा

| Updated on: Sep 11, 2026 | 12:00 PM
Share

पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मोनाली विधाते हिच्याविरोधात खंडणी आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारीरिक व्याधी बऱ्या करण्याच्या नावाखाली तिने एका व्यक्तीकडून ४७ हजार रुपये उकळले. पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. विधातेवर से*क्स रॅकेट चालवण्याचाही आरोप आहे.

पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात मोनाली विधाते नावाच्या महिलेविरोधात फसवणूक, खंडणी आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवीच्या नावाखाली शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून तिने एका तक्रारदाराकडून सुमारे ४७ हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर रील्स पाहून ते मोनाली विधातेच्या संपर्कात आले होते. आपल्या शारीरिक समस्यांवर उपाय मिळेल या आशेने त्यांनी विधातेला भेट घेतली. विधातेने उतारे आणि विधी करण्याचे आश्वासन देत वेळोवेळी पैसे घेतले.

मात्र, प्रकृतीत कोणताही फरक न पडल्याने आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागितल्यावर मोनाली विधातेने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात केवळ मोनाली विधाते नव्हे, तर तिची एक टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तिच्यावर यापूर्वीही वेश्याव्यवसाय चालवल्याचे आणि अनेक नावांनी (सोनिया ठाकूर, मोनाली वावळ) ओळखली जात असल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Published on: Sep 11, 2026 12:00 PM

Follow Us