मुंबई विमानतळावर विमानाला पुशबॅक करणाऱ्या गाडीला आग, मात्र कुठलीही हानी नाही
Mumbai International Airport : मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात होता होता टळला. एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देणार्या वाहनाला विमानाजवळ आग लागली. हे विमान प्रवाशांनी खचाखच भरले होते.
Mumbai International Airport : मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात होता होता टळला. एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देणार्या वाहनाला विमानाजवळ आग लागली. हे विमान प्रवाशांनी खचाखच भरले होते. ही घटना आज सकाळी घढली. या आगीमुळे विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. एअर इंडियाचे हे विमान मुंबईहून जामनगरला जात होते. एअर इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ट्रॉली ओढणाऱ्या ट्रॅक्टरला आग कशी लागली, याचा तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
समोर आलेल्या माहितीनुसार, विमान प्रवाशांनी भरलं होतं. एअर इंडियाच्या AIC-647 विमानाजवळ हा अपघात झाला. विमान मुंबईहून जामनगरला जाणार होते. एअर इंडियाच्या या विमानात 85 प्रवासी बसले होते. पुशबॅक ट्रॅक्टरला आग लागल्याची माहिती मिळताच विमानतळावर उपस्थित असलेल्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली.
Published on: Jan 10, 2022 03:28 PM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

