राजू पाटील मनसेवर दावा सांगणार? निकाल लागला शिवसेनेचा मात्र का होतेय मनसेची चर्चा?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरून तर्क-वितर्क लावले जात आहे. हाच न्याय जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लावला तर मनसे हा विधिमंडळ पक्ष त्याचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मिळू शकतो का? अशी चर्चा रंगली.
मुंबई, १२ जानेवारी २०२४ : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्र अपात्र प्रकरणावर निकाल दिला. मात्र चर्चा मनसेचीही होतेय. तर अजित पवार गटाची बहुमताबद्दलची बदलेली भूमिका देखील चर्चेत आहे. घटना आणि पद रचनेचा दाखला देताना विधीमंडळ पक्षातील बहुमत म्हणजेच राजकीय पक्ष असल्याचे राहुल नार्वेकर यांनी निकालात म्हटलं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरून तर्क-वितर्क लावले जात आहे. हाच न्याय जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लावला तर मनसे हा विधिमंडळ पक्ष त्याचे एकमेव आमदार राजू पाटील यांना मिळू शकतो का? अशी चर्चा रंगली. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाच्या भूमिकेचीही गोची झाली. एकनाश शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात कोर्टात सुरू असलेला खटला हा राजकीय पक्ष मोठा की विधीमंडळ पक्ष मोठा यावर उभा होता. राजकीय पक्षात कुणाचा समावेश होतो आणि विधीमंडळ पक्षात कुणाचा समावेश होतो? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

