Raj Kundra | उद्योगपती राज कुंद्राची रोजची 10 लाखांची कमाई?

राज कुंद्रा (Raj Kundra) कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. काही तासांच्या चौकशीनंतर त्याला सोमवारी अटक करण्यात आली. मंगळवारी कोर्टाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. काही तासांच्या चौकशीनंतर त्याला सोमवारी अटक करण्यात आली. मंगळवारी कोर्टाने त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवल्याचा आणि अॅपद्वारे प्रदर्शित केल्याचा आरोप आहे. राज कुंद्राचा प्रदीप बक्षी नावाचा जोडीदार ज्याच्याबरोबर राज कुंद्राची व्हॉट्सअॅप चॅट समोर आली आहे. या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून उघडकीस आले आहे की, राज कुंद्रा स्वत: अश्लील चित्रपटांच्या निर्मितीपासून ते त्यांच्या वितरणापर्यंतच्या सर्व व्यवसायांवर नजर ठेवत असे. राज कुंद्राला यातून दररोज  दोन ते तीन लाख रुपये ते 10 लाख मिळत असल्याचं समोर आलं आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI