“राष्ट्रवादीच्या बंडामागे शरद पवारच, मला ‘ही’ तीन माणसं संशयास्पद वाटतात”, राज ठाकरे यांचं वक्तव्य
मविआत असताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर आणि भाजपवर सडकून टीका केली होती. मात्र आता ते शिंदे-फडणवीस सराकमध्ये सामील झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्याच्या या राजकीय परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.
पुणे : महाराष्ट्रात सध्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहे. कालपर्यंत एकमेकांवर टीका करणारे आता सत्तेसाठी एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर आणि भाजपवर सडकून टीका केली होती. मात्र आता ते शिंदे-फडणवीस सराकमध्ये सामील झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्याच्या या राजकीय परिस्थितीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. “या सर्व गोष्टींची महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवात केली. त्यांनी जो पहिला पुलोदचा प्रयत्न केला त्यावेळी काय केलं? शरद पवार यांच्याकडून सुरुवात झाली. शेवट त्यांच्यापर्यंतच आला. पण…”, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

