मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन… राज ठाकरे प्रचंड संतापले; निवडणूक आयोगावर हल्ला
निवडणूक आयोगाकडून EVM मशीनला लावण्याकरिता नवीन यूनिट तयार करण्यात आलंय. हे मशीन नेमकं काय आहे? हे जनेतला माहीत नाही. निवडणूक आयोगाने हे कोणाला दाखवलं देखील नाही. त्यांना हवं ते करत आहेत, असा आरोप मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून EVM मशीनला लावण्याकरिता नवीन यूनिट तयार करण्यात आलंय. हे मशीन नेमकं काय आहे? हे जनेतला माहीत नाही. निवडणूक आयोगाने हे कोणाला दाखवलं देखील नाही. त्यांना हवं ते करत आहेत, असा आरोप मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर रोजच्या रोज कायदे बदलत आहेत. हा काय प्रकार आहे? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केलाय. सरकारला जी गोष्ट हवी, ती करून देण्यासाठी निवडणूक आयोग आहे का? असा प्रश्न विचारत सरकारला हव्या असणाऱ्या सुविधांसाठी निवडणूक आयोग काम करतंय का? असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. तसेच उद्या मतदानाच्या दिवशी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना केलं आहे.
मतदानाच्या दिवशी ईव्हीएमसोबत नवीन मशीन... राज ठाकरे प्रचंड संतापले
पालिकेच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; निवडणूक साहित्याच वाटप सुरू
बिनविरोध निवडीवरची सुनावणी संपली, काय घडलं कोर्टात?; मोठा निर्णय काय?
संक्रातिनिमित्त नाशिकच्या गोदा घाट परिसरात पर्यटक, भाविकांची गर्दी

