Raghav Chadha | राघव चड्ढा यांच्यासारखं… पंजाबमधील घडामोडींवर भाजप नेत्याचं मोठं विधान
आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही काही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आम आदमी पक्षात मोठी फूट पडली आहे. खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सोबतच आप पक्षाच्या इतरही काही खासदारांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यानंतर ‘आप’च्या त्या सातही खासदारांनी भाजप कार्यालयात जाऊन अध्यक्षांची भेट घेतली. दरम्यान, या पक्षांतरावर विविध पक्षांतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
भाजपचे युवा नेते कृष्णराज महाडीक यांनीदेखील या घटनेवर वक्तव्य केलं, ते म्हणाले, “राघव चड्ढांसारखं तरुण नेतृत्व भाजपसोबत आलं ही चांगली बाब आहे, ते नेहमीच महत्त्वाचे मुद्दे मांडतात. इतकेच नाही, तर भाजपने त्यांच्या अनेक विचारांचं, विकासकार्यांचं समर्थन केलं आहे.”
पुढे महाडीक म्हणाले, “त्यांच्या भाजप प्रवेशाचा आनंद आहे.” यानंतर महाडीक यांनी इतर अनेक विषयांवरही भाष्य केले.
Published on: Apr 25, 2026 02:22 PM
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...

