‘धनुष्यबाण’ ठाकरेंना, ‘घड्याळ’ शरद पवारांना मिळणार; रोहित पवारांच्या दाव्याने राजकीय खळबळ
दादांचे-शिंदेंचे आमदार असणाऱ्या ठिकाणी भाजपचे पक्षप्रवेश हे नव्या राजकीय भूकंपाचे संकेत असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे.
दादांचे-शिंदेंचे आमदार असणाऱ्या ठिकाणी भाजपचे पक्षप्रवेश हे नव्या राजकीय भूकंपाचे संकेत असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे. दोघांचे पक्ष-चिन्ह गेले तर या ठिकाणी निवडणुका होणार, असंही आमदार रोहित पवार यांनी यावेळी म्हंटलं आहे.
सुनील तटकरे 2029ची निवडणूक भाजपमधून लढणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. तर यानंतर स्वत: रोहित पवारच 2019मध्ये भाजपमधून लढणार होते, असं म्हणत तटकरेंनी पलटवार केला आहे. धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार असून, काही महिन्यात घड्याळ चिन्ह आम्हाला मिळणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपात विलीन करण्याचा पर्याय असू शकतो किंवा दोन्ही पक्षाचे आमदार असणाऱ्या ठिकाणी नव्यानं निवडणूक होऊ शकते, असा दावाही रोहित पवारांनी केला. भाजपकडे 132 आमदार असून त्यांना 12 आमदार हवेत. त्यांना फक्त 144चं बहुमत पार करायचं आहे. यासाठी भाजपनं आतून खेळी केल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

