अखेर प्रकरण पेटलंच! नवी मुंबईत विरोधकांचं तीव्र आंदोलन, रोहित पवारांसह जितेद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यात
मुंबईत विविध प्रश्नांवरून आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. इंधन दरवाढ, LPG सिलिंडरच्या वाढलेल्या किमती आणि महागाईविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला.
मुंबईत विविध प्रश्नांवरून आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. इंधन दरवाढ, LPG सिलिंडरच्या वाढलेल्या किमती आणि महागाईविरोधात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केला. महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच चुल मांडून चपात्या तयार करत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी धक्काबुक्की आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं.
या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
महागाई आणि इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक त्रस्त असून सरकारने तातडीने दर कमी करावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी आणि बॅनरबाजी पाहायला मिळाली.
Published on: Jun 03, 2026 11:51 AM
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच

