राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्यांवरून आमदार रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘राजकीय उद्योग सोडा आणि उद्योजकांच्या अडचणी सोडवा’, असा टोला त्यांनी लगावला. चाकण एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर PMRDA, महानगरपालिका, PWD, राष्ट्रीय महामार्ग आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कमिटी स्थापन […]
चाकण एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्यांवरून आमदार रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘राजकीय उद्योग सोडा आणि उद्योजकांच्या अडचणी सोडवा’, असा टोला त्यांनी लगावला.
चाकण एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला. रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर PMRDA, महानगरपालिका, PWD, राष्ट्रीय महामार्ग आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त कमिटी स्थापन करून समस्या सोडवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
रोहित पवार आज चाकण एमआयडीसीला भेट देणार आहेत. तसेच एमआयडीसीकडे पूर्वी २५ हजार कोटी रुपये एफडीमध्ये होते, आता किती निधी शिल्लक आहे? असा सवाल करत त्यांनी निधीच्या वापराबाबतही प्रश्न उपस्थित केला.
Published on: Aug 14, 2026 11:10 AM
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत

