राजकीय गणित बदलणार? शरद पवारांचा गट सत्तेसोबत जाण्याच्या चर्चेदरम्यानच सचिन अहिरांनी घेतली पवारांची भेट
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटातील विश्वासू नेते आणि आमदार सचिन अहिर यांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर यांचे पक्षाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांना विधानसभेच्या उपसभापतीपदाची जबाबदारी देण्यात आली. या नियुक्तीनंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.
आज, 08 जुलै रोजी सचिन अहिर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर राज्यात विविध राजकीय चर्चांना उधाण आले. शरद पवार गट सत्ताधारी पक्षासोबत जाणार असल्याच्या चर्चांमध्ये या भेटीला महत्त्व प्राप्त झाले.
मात्र, माध्यमांशी बोलताना सचिन अहिर यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. उपसभापतीपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर भेटीची वेळ ठरवून ही भेट झाल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले.
Published on: Jul 08, 2026 12:13 PM
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप