Sambhaji Bhide : ना धड स्त्री ना धड पुरूष… सर्वधर्म समभाव यावरून संभाजी भिडे पुन्हा बरळले, नेमकं म्हणायचंय तरी काय?
' आंबे खाऊन मुल होतं, मी आंब्याचं झाड लावलं तिथे तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकतात. खग्रास ग्रहण काळात मंत्राचा जप केल्यास मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते.', संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
आंबा खाऊन मुलं होतात, या वक्तव्यावर संभाजी भिडे आजही ठाम असून संभाजी भिडे हे पुन्हा बरळ्याचा प्रकार पाहायला मिळाला. सर्वधर्म समभाव हा नपुंसक प्रकार असल्याचे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमधील एका व्याख्यानात बोलताना संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले आहे. दरम्यान, संभाजी भिडे यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. ‘सर्वधर्म समभाव हा नीचपणा आणि नपुंसकपणा आहे. हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरूष म्हणजे नपुंसकपणा आहे. देव, देश आणि धर्मासाठी कटिबद्ध राहा..’, असं नाशिकच्या व्याख्यानात संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, १५ ऑगस्टला तिरंगा फडकवू… तर लाल किल्ल्यावर भगवा फडकावा यासाठी काम करा. सगळ्यांमध्ये सामील होऊ, तिरंगा फडकवू पण डोक्यात हिरोजी फर्जदने सांगितले ते काम करू.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

