AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sambhaji Bhide : सर्वधर्म समभाव म्हणजे नपुसंकपणा; संभाजी भिडेंना म्हणायचे काय? म्हणाले, लाल किल्ल्यावर भगवा फडकवा

Sambhaji Bhide controversy : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादाची ठिणगी टाकली. सर्वधर्म समभाव हा नपुसंकपणा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तर 'आंब्या' च्या त्या वक्तव्याचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केला.

Sambhaji Bhide : सर्वधर्म समभाव म्हणजे नपुसंकपणा; संभाजी भिडेंना म्हणायचे काय? म्हणाले, लाल किल्ल्यावर भगवा फडकवा
संभाजी भिडे गुरुजी
| Updated on: Aug 05, 2025 | 10:13 AM
Share

सर्वधर्म समभाव हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री, ना धड पुरूष म्हणजे नपुंसकपणा आहे, असे वक्तव्य संभाजी भिडे गुरुजींनी केले. शिवप्रतिष्ठा प्रतिष्ठानचे संस्थापक भिडे यांच्या मते, सर्वधर्म समभाव हा नीचपण आहे. त्याचवेळी स्वातंत्र्यावेळी तिरंगा झेंडा आपण स्वीकारला. तिरंगा आणि संविधान आपण मानलेच पाहिजे. पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचं प्रतिक आहे. त्यामुळे देव, देश आणि धर्मासाठी कटिबद्ध राहा. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवूच . पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, असे भिडे गुरुजी म्हणाले. नाशिक दौऱ्यावर असताना संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले.

‘आंब्या’च्या त्या वक्तव्यावर भिडे ठाम

आंबा खाऊन मुलं होतात, या वक्तव्यावर संभाजी भिडे हे ठाम आहेत. त्यांनी नाशिक येथील कार्यक्रमात या वक्तव्याचा पुनरूच्चार केला. मी आंबे खाऊन मुलं होतात, असं बोललो होतो. मी एक आंब्याचं झाड लावलं आहे. तिथे आजही तुम्ही जाऊन आंबे खाऊ शकता. त्या वक्तव्यावरून माझ्यावर खटला सुरू आहे, हे सांगायला गुरुजी विसरले नाहीत. त्याचवेळी त्यांनी या वक्तव्याला प्रसिद्धी देणाऱ्या आणि सवाल करणाऱ्या माध्यमांवर आगपाखड सुद्धा केली.

तर मिळेल मंत्राची शक्ती

खग्रास ग्रहाच्या काळात एकदा मनुष्य एखाद्या मंत्राचा जप करेल त्याला त्या मंत्राची शक्ती मिळते. जन्मोजन्मी शक्ती मिळते, असे भिडे गुरूजी म्हणाले. गायत्री मंत्राचा जप शिवाजी महाराज यांनी केला होता, अंगावरचे कपडे काढून मानेपर्यंत शीत (थंड)पाण्यात काही तास होते. तीन एप्रिल रोजी त्यांना ताप असाह्य झाला. तोंडांवाटे पाणी दिलेले शरीरातून बाहेर पडत होते. शरीर पूर्ण खचले होते. शिवाजी महाराज हे उपस्थित असलेल्या व्यक्तींना म्हणाले की आम्ही जातो आमचा काळ झाला. सप्तसिंधू सप्त गंगा मुक्त करा हे त्यांचे शेवटचे शब्द: होते. त्या भडव्या औरंग्याला गाडा, काशी विश्वेश्वर मुक्त करा, असे ते म्हणाले होते, असे संभाजी भिडे म्हणाले.

गणोजी शिर्केंविषयी आगपाखड

सोयराबाई यांना जे वाटतं होत ते शक्य नव्हतं, सोयराबाई यांना छत्रपती संभाजी महाराज राजा व्हावं असं वाटत नव्हते. राजाराम महाराज हे संभाजी महाराज यांच्या नंतर राजे झालेच. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात साम्य काय तर, संभाजी महाराज हे शिवाजी महाराज यांच्या तोडीस तोड व्यक्तीमहत्व होते. संभाजी महाराज यांच्या पत्नीचा भाऊ गणोजी शिर्के हा नालायक माणूस ज्यानं वतनासाठी शेण खाल्लं, असे वक्तव्य भिडे यांनी केले.

हिरोजी फर्जंद विसरू नका

15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिवस साजरा करू. तिरंगा फडकू. पण लवकर दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार यासाठी काम करा हे आपले काम आह. सगळ्यांमध्ये सामील होऊ, तिरंगा फडकू. पण डोक्यात हिरोजी फर्जंद यांनी सांगितले ते काम करू, असे सांगायला भिडे गुरूजी विसरले नाहीत.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक