नारायण राणे अन् त्यांची दोन नेपाळी पोरं खुलेआम शिव्या देतात, कुणाची जळजळीत टीका?
संजय राऊत यांनी पहिल्यांदाच नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राणेंनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर नारायण राणेंना अटक झाली, त्यासारखीच अटक उद्धव ठाकरेंना होणार का? अशा चर्चाही होत आहेत.
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांनी भर पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री नालायक आहेत असा उच्चार केला. यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. दरम्यान, राज्यातील राजकारण नालायक या शब्दावरून चांगलंच रंगलंय. संजय राऊत यांनी पहिल्यांदाच नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राणेंनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर नारायण राणेंना अटक झाली, त्यासारखीच अटक उद्धव ठाकरेंना होणार का? अशा चर्चाही होत आहेत. नाराणय राणे यांच्या टीकेला राऊतांना प्रत्युत्तर दिलंय इतकंच नाहीतर त्यांच्या मुलावरही निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, नारायण तातू राणे हे केंद्रात मंत्री आहे असं म्हणत त्यांना दोन नेपाळी मुलं आहेत, जे खुलेआम शिव्या देतात. तर राणे आणि त्यांच्या मुलांवर का कारवाई केली जात नाही? असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली. या टीकेवर नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
Published on: Nov 29, 2023 04:17 PM
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
