Sanjay Raut | तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्षांबाबत खळबळजनक विधान
विधानसभेच्या अधिवेशनात दिवंगत गायिका आशा भोसले यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव वाचताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मराठी उच्चारांवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल केले असून विरोधकांनीही यावर जोरदार टीका केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील नार्वेकर यांच्या वाचनशैलीवर प्रश्न उपस्थित केले होते.

यानंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत संतप्त प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना मराठी वाचता आणि बोलता येत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “हे नार्वेकर नसून नॉर्वेकर आहेत,” असा टोला राऊत यांनी लगावला. तसेच महाराष्ट्रात मराठी सक्तीची भाषा असल्याचे सरकार सांगते, मात्र विधानसभा अध्यक्षांनाच मराठी नीट येत नसल्याचे त्यांनी म्हटले.
आशा भोसले यांच्यासारख्या महान गायिकेचा शोक प्रस्ताव नीट वाचता न आल्याने मराठी भाषेचा अपमान झाल्याचेही राऊत म्हणाले. जर मी विधानसभेत असतो तर पेपरवेट फेकून मारला असता, असे वक्तव्य करत त्यांनी संताप व्यक्त केला.
Published on: Jun 24, 2026 11:07 AM
तर मी पेपरवेटच फेकून मारला असता; संजय राऊतांचं थेट विधानसभा अध्यक्ष...
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण