AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा 'तो' फोटो शेअर अन् केला गंभीर आरोप; म्हणाले...

संजय राऊत यांच्याकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘तो’ फोटो शेअर अन् केला गंभीर आरोप; म्हणाले…

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Nov 20, 2023 | 3:13 PM
Share

राऊतांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो शेअर करत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा वादळ येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊमध्ये जुगार खेळत आहेत असा गंभीर आरोपही केलाय

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३ : संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेत नव नवे आरोप आणि वक्तव्य करत असतात. मात्र आज त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा तो फोटो शेअर करत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा वादळ येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र पेटलेला असताना हे महाशय मकाऊमध्ये जुगार खेळत आहेत असा गंभीर आरोप करत फोटो झुम करून बघा हे तेच महाशय आहेत ना? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. तर या फोटोमधील व्यक्तीने एका रात्रीत 3.50 कोटी रुपये कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. त्याच ट्वीटच्या पुढच्या भागात संजय राऊत म्हणाले, ते म्हणे..फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे..कधीच जुगार खेळले नाहीत..मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय! असे राऊतांनी त्यात म्हटले.

Published on: Nov 20, 2023 03:10 PM
Follow Us