AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांबाबत राऊतांचे धक्कादायक विधान

त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी अग्रस्थानी; सुप्रिया सुळेंच्या व्याह्यांबाबत राऊतांचे धक्कादायक विधान

| Updated on: Jun 01, 2026 | 11:39 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.  त्यांनी अहिल्यानगरातील नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश, अरुण लखानी-मोदी भेट आणि 'भाजपयुक्त काँग्रेस' यावर रोकठोक भाष्य केले. यामध्ये ते प्रामुख्याने सुप्रिया सुळेंची लेक रोहिणी सुळे हिच्या सासरच्या मंडळींबाबत बोलले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.  त्यांनी अहिल्यानगरातील नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश, अरुण लखानी-मोदी भेट आणि ‘भाजपयुक्त काँग्रेस’ यावर रोकठोक भाष्य केले. यामध्ये ते प्रामुख्याने सुप्रिया सुळेंची लेक रोहिणी सुळे हिच्या सासरच्या मंडळींबाबत बोलले. भाजपने सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखानी यांना उमेदवारी दिली. याविषयी राऊतांनी मोठं विधान केलं आहे.

यानंतर संजय राऊत यांना अरुण लखानी यांच्या उमेदवारीबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावरही त्यांनी भाष्य केले. अरुण लखानी हे काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले नेते नाहीत. ते जन्मजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) आहेत. ते संघाचे निष्ठावान कार्यकर्ते, समर्थक आणि पदाधिकारी आहेत. सर्वच बाबतीत संघाला ताकद देणारे ते एक सद्गृहस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी मोदींची भेट घेतली यात आश्चर्यकारक काय आहे? जेव्हा मी दिल्लीत राज्यसभेतील अनेक लोकांची माहिती घेतो, तेव्हा त्यांचे मूळ कुठेतरी संघाशी जोडलेले असतेच. विदर्भात भाजपचे जे कोणी जुने आणि ज्येष्ठ चेहरे आहेत, त्या पुराण पुरुषांच्या यादीत लखानी यांचे नाव अग्रक्रमाने येते. संघ आणि भाजप काय वेगळे आहेत का? हे दोन्ही एकच आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Published on: Jun 01, 2026 11:36 AM

Follow Us
‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

Vikram 1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण, पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च.

Vikram 1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण, पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच….

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच…

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले.

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक.

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?.

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?