Sanjay Raut | छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडेबोल
आमदार संजय गायकवाड यांचा 'शिवाजी कोण होता' पुस्तकावरील वाद ताजा असतानाच, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले. या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी एका पाठोपाठ सगळ्यांना झापलं. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.
आमदार संजय गायकवाड यांचा ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरील वाद ताजा असतानाच, बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले. या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी एका पाठोपाठ सगळ्यांना झापलं. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड जर दुसऱ्या कोणी केली असती तर शिवरायांचा अपमान झाला हो, असे म्हणत भाजप रस्त्यावर उतरली असती. मात्र इथे कोणी छत्रपती शिवरायांना तुम्ही थकलेला माणूस म्हणतंय, तुम्हाला कुठून हे सुचतंय, असा सवाल संजय राऊतांनी केला.
Published on: Apr 26, 2026 12:01 PM
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....

