Sanjay Raut | महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला … संजय राऊत यांचा मोठा दावा
लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं ते विधेयक नामंजूर झालं. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जळजळीत आरोप केले.
लोकसभेत शुक्रवारी केंद्र सरकारने महिला आरक्षण अर्थात नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं होतं ते विधेयक नामंजूर झालं. हा सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र याच मुद्यावरुन राजकारण पेटलं आहे. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर जळजळीत आरोप केले.
संजय राऊत म्हणाले, “2023 ला लोकसभेत मंजूर झालेले विधेयक तातडीने लागू करा. महिला आरक्षणाच्या विधेयकाबाबत सरकार खोटं बोलतंय. आता ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. मोर्चे काढले जात आहेत, त्यात महिलांपेक्षा जास्त पुरुषच आहेत. त्यांना हजार रुपये दिले जात असतील.”
पुढे संजय राऊत म्हणाले, “महिलांना 1500 रुपये द्यायचे बंद करा, तेव्हा कळेल की नारी शक्ती कोणाच्या बाजूने आहे.” यावेळी माध्यमांसमोरच राऊतांनी मोठा दावा केला.
Published on: Apr 22, 2026 11:16 AM
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....

