‘ही कालची पोरं, पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करतात
गोव्यात कोणताही पक्ष जिंकत नसतो. गोव्यात फक्त व्यक्ती जिंकते, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी 'ही कालची पोरं, पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करतात असे भाष्य देखील केले.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर (bjp) टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी राज्यात सुरु असलेल्या ईडी सत्रावर भाष्य करताना केंद्र सरकारला लक्ष्य केलं. तपास यंत्रणांना महाराष्ट्रात टार्गेट दिलं आहे, असं संजय राऊतांनी म्हणत तपास यंत्रणांवरच प्रश्न उपस्थित केलाय. तर याचवेळी राऊतांनी राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या टार्गेटवर असल्याचा खळबळजनक दावाही पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, भाजपनं विजय मिळवलेल्या उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, उत्तराखंड या चार राज्यांतील विजयाचा उन्माद मांडून नये, असं सांगायलाही राऊत विसरले नाही. गोव्यात कोणताही पक्ष जिंकत नसतो. गोव्यात फक्त व्यक्ती जिंकते, असं म्हणत राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी ‘ही कालची पोरं, पवारांसारख्या मोठ्या नेत्यांवर टीका करतात असे भाष्य देखील केले.
Published on: Mar 14, 2022 11:36 AM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
