Imtiyaz Jaleel : जलील म्हणताय की संजय शिरसाटांना खाण्याचं वेड नाही, तर पिण्याचं… त्यांचं लक्ष ब्रँडवर!
१५ ऑगस्ट रोजी काही महानगरपालिकांनी मांसविक्री आणि कत्तलीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. १९८८ च्या एका कायद्याचा आधार घेत कल्याण-डोंबिवली, नागपूर, अमरावती, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये ही बंदी लागू केलीये
१५ ऑगस्ट रोजी चिकन आणि मटण विक्री बंदीच्या पालिकेच्या निर्णयावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. १५ ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनानिमित्त मांसविक्रीवर बंदी घालण्याच्या महापालिकेच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करत इम्तियाज जलील यांनी आपल्याच घरी बिर्याणी पार्टीचा बेत आखला. इतकंच नाहीतर या पार्टीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरच्या पालिका आयुक्तांना निमंत्रण दिल्याचे पाहायला मिळाले.
जलील यांच्या या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांनी जलील यांच्यावर निशाणा साधत ही सगळी नाटकं आहे. आपला TRP वाढवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी असे प्रकार सुरू असल्याचे म्हणत घणाघात केला. दरम्यान, शिरसाटांच्या प्रत्युत्तरावर पलटवार करत जलील यांनी खोचक टीका केली आहे. जलील म्हणाले, शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे. मी मार्केटमध्ये गेलो तर मटण आणू शकतो, कधी चिकन असू शकतो. त्यांच्या बॅगेत काय असते हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि ते काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना पिण्याबद्दल विचारा कोणते ब्रँड आहेत, त्यांचं ब्रँडवर लक्ष असतं, असं खोचकपणे जलील म्हणाले.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

