Sanjay Shirsat | विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, संजय शिरसाटांचा मोठा दावा- उद्धव ठाकरेच उमेदवार…
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना वेग आला असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी दावा करत सांगितलं की, उद्धव ठाकरे हेच विधानपरिषदेचे उमेदवार असणार असून ते स्वतः निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

शिरसाट म्हणाले की, सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील विविध नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असल्या, तरी या सर्व केवळ चर्चेपुरत्याच आहेत. “काँग्रेस म्हणते की ठाकरे असतील तर आम्ही विचार करू, राष्ट्रवादी पाठिंबा देण्याची भूमिका घेत आहे, तर ठाकरे गटातील नेतेही अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं सांगत आहेत. मात्र या सर्व बातम्यांमध्ये कितीही बदल झाले तरी अंतिम उमेदवार उद्धव ठाकरेच असतील,” असा ठाम दावा त्यांनी केला.
शिरसाट यांनी पुढे म्हटलं की, उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेत जाण्याची स्पष्ट मानसिकता आहे आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते ही निवडणूक लढतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीच्या चर्चांना नव्या वळण मिळालं असून, आगामी निवडणुकीत काय घडामोडी होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Apr 25, 2026 02:38 PM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...