नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण अन् आरोपींच्या मानसिकतेचा विचार, देशमुख कुटुंब थेट भगवानगडावर…काय झाला संवाद?
धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्याप्रकरणात नाहक लक्ष्य करण्यात येत आहे. तर हत्येपूर्वी आरोपींची मानसिकता सुद्धा तपासावी अशा वक्तव्याने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर राज्यातून चोहोबाजूने टीकेची झोड उठली.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता मीडियाने का समजून घेतली नाही? असं वक्तव्य करणाऱ्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री सानप सोशल मीडियावर टीकेचे धनी बनले. महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावर देशमुख कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. इतकंच नाहीतर ते आज भगवानगड येथे दाखल होत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हजर होते. याभेटीदरम्यान, संतोष देशमुख यांच्या खूनामागील खरं कारण, आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडाची दादागिरी, खंडणीचे प्रकार यासंदर्भातील सगळे विषय नामदेव शास्त्री यांच्या कानावर घातल्याचे पाहायला मिळाले. देशमुख कुटुंबाने कधीच जातीवाद केला नाही, देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्याच्या हत्येनंतर दिसलं असतं, असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.हा न्यायाचा लढा आहे. अतिशय क्रूर हत्या झाली आहे. प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत आहे. राजकीय नेते, संप्रदायाचे लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आमच्यासोबत आहेत. न्यायाच्या भूमिकेत आहेत. अशावेळी लोकप्रतिनिधींना जातीयवादी म्हणू नका. नाही तर ते कोणत्याच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही. न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचं ठरवू नका, अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केली.

भेटायला जायला ते काय आयसीयूत गेले होते की कोमात? मनोज जरांगे संतापले

संतोष देशमुख लढा आणि मुंडेंची तब्येत वेगळी...,' काय म्हणाले सुरेश धस

वाल्मिक कराडची बी टीम सक्रीय आहे..,' काय म्हणाले धनंजय देशमुख

आरबीआयने आणले या बँकेवर निर्बंध, मुलांचे लग्न, घराचे हप्ते सर्वच रखडले
