Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौफेर टीकेनंतर भूमिकेत बदल? भगवानगड महंत नामदेव शास्त्रींच्या सवालावर पंकजा मुंडेंचं 'नो कमेंट'

चौफेर टीकेनंतर भूमिकेत बदल? भगवानगड महंत नामदेव शास्त्रींच्या सवालावर पंकजा मुंडेंचं ‘नो कमेंट’

| Updated on: Feb 02, 2025 | 10:32 AM

मारेकऱ्यांची मानसिकता मिडीयाने का दाखवली नाही? असं विधान केल्यानंतर महंत नामदेव शास्त्री सोशल मीडियावर टीकेचे धनी बनले. त्यानंतर त्यांनी माध्यमांना पुन्हा प्रतिक्रिया देत आपल्या भूमिकेत बदल केल्याचा दिसला.

मीडियाने संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांची मानसिकता का समजून घेतली नाही? असं वक्तव्य करणाऱ्या नामदेव शास्त्री सानपांवर सोशल मीडियावर चौफेर टीका झाली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका महंत पदावर असणाऱ्या व्यक्तीने अप्रत्यक्षपणे निर्घृण हत्या करणाऱ्यांची पाठराखण केली का? अशाही चर्चा रंगल्या. मात्र त्यानंतर नामदेव शास्त्री सानपांची भूमिका बदलल्याचे पाहायला मिळाली. यावरून वाल्याचा वाल्मिकी करणारे संत न्यू इंडियात आले की काय? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. नामदेव शास्त्री सानपांच्या अनेक भूमिका रंजक आहेत. ज्यावेळी त्यांना पंकजा मुंडेंवरील चिक्की घोटाळ्यांच्या आरोपांवेळी का पाठिंबा दिला नाही? त्यावर शास्त्री म्हणाले, तेव्हा पंकजा मुंडे माझ्याकडे आल्याच नाहीत. आता धनंजय मुंडे आलेत म्हणून त्यांनी मी पाठिंबा दिला. त्यावर प्रतिसवाल करताना मग उद्या वाल्मिक कराड आला तर पाठिंबा द्याल का? त्यावर शास्त्री म्हणाले, ‘कराड नेता नाही, नेते महान आणि मेहनती असतात. आपण फक्त नेत्यांबद्दल बोलतोय.’ तर २०१६ ला भगवानगडावर राजकारण नको म्हणून नामदेव शास्त्री सानपांनी पंकजा मुंडे यांना विरोध केला होता. त्यावरून मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी शास्त्रींच्या भूमिकेवर सवाल केलेत. त्यावर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

Published on: Feb 02, 2025 10:32 AM