Satara Rain : मे महिन्यातच महाबळेश्वरचं सौंदर्य फुललं, लिंगमळा धबधबा फेसाळला VIDEO तर बघाच
मे महिन्यातच महाबळेश्वरमधील सौंदर्य पावसाळ्यासारखे खुलले आहे. अशातच सध्या शाळांना सुट्या असल्याने पर्यटनासाठी महाबळेश्वरमध्ये मोठी गर्दी झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे लहान मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. महाबळेश्वरमध्ये पडलेल्या पावसामुळे लिंगमळा धबधबा मे महिन्यातच फेसाळला असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून महाबळेश्वरला पर्यटक भेटी देत असतात. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये होत असलेल्या विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री 25 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तसेच सोमवारीही महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे येथील वेण्णा नदीवरील लिंगमळा धबधबा ओसांडून वाहू लागला आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला असून शेतीसह नदी नाले दुतडी भरून वाहू लागले आहेत. प्रसिद्ध असणारा लिंगमळाचा धबधबा फेसाळला असून या धबधब्याला पाहण्यासाठी महाबळेश्वरमधील दाखल झालेले पर्यटक गर्दी करू लागले आहेत.
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया

