विजयाचा आनंद आहे पण, काँग्रेसच्या माध्यमातून झाला असता तर… ; काय म्हणाले सत्यजित तांबे
नाशिक पदवीधर मतदारसंघात विजयी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करू नका, असे सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्यांना का सांगितले?
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होती. या निवडणुकीत शुभांगी पाटील यांनी चांगलं आव्हान निर्माण केलं होतं. पण त्यांचा पराभव झाला. सत्यजित तांबे हे भरघोस मतांनी विजयी झाले. सत्यजित तांबे यांनी 68 हजार 999 मतं मिळवली आणि ते विजयी झालेत. मात्र या विजयानंतरही सत्यजित तांबे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणताही आनंदोत्सव साजरा करू नका असे सांगितले होते. याबाबत बोलताना ते म्हणाले, आमचे सहकारी आणि नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचं बुधवारी रात्री अपघाती निधन झालं. यासर्व निवडणुकीदरम्यान, मानस पगार माझ्या पाठिशी खंबीरपणे उभा होता आणि अचानक त्यांचे अपघाती निधन झाल्यामुळे या विजयाचा आनंद साजरा करायचा नाही, असे ठरविले. तर या विजयाचा आनंद आहे पण हा विजय काँग्रेसच्या माध्यमातून झाला असता, तर जास्त आनंद झाला असता अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

