वंचितच्या 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कोणा-कोणाला मिळालं लोकसभेचं तिकीट?
आगामी लोकसभा निवडणुकीकरता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचितकडून ११ उमेदवारांची यादी समोर आली आहे. यापूर्वी देखील वंचितने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं.
आगामी लोकसभा निवडणुकीकरता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. वंचितकडून ११ उमेदवारांची यादी समोर आली आहे. हिंगोलीतून डॉ. बी.डी चव्हाण, सोलापुरमधून राहुल गायकवाड यांना उमेदवारी तर माढ्यातून रमेश बारस्करांना उमेदवारी दिली. यापूर्वी देखील वंचितने उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. ते अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. तर दुसऱ्या यादीत लातूरमधून नरसिंग उदगीरकर, साताऱ्यातून मारूती जानकर, धुळ्यातून अब्दुर रेहमान, हातकणंगले येथून दादासाहेब पाटील, रावेरमधून संजय ब्राम्हणे, जालन्यातून प्रभाकर बकले, मुंबई उत्तर मध्य येथून अब्दुल हसन खान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून काका जोशी हे लोकसभा निवडणूक लढवणार आहे.
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
