एकच खळबळ! शरद पवार सत्तेत येण्याच्या तयारीत? बड्या नेत्याला दिली जबाबदारी अन्…
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल अशा काही चर्चांना सध्या जोराचे उधाण आले आहे. कालच बारामतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी अचानक दिसून आल्या.
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल अशा काही चर्चांना सध्या जोराचे उधाण आले आहे. कालच बारामतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी अचानक दिसून आल्या. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात असून, अशातच शरद पवार गटही सत्तेत जाणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार गटही NDA मध्ये सामील होण्याची तयारी करत आहे. अलीकडील काही चर्चांनुसार सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यातील बैठकीत या विषयावरच विचार झाला असावा. ताज्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटात एका बड्या नेत्यावर याबाबतची जबाबदारी देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व घडामोडी पाहता राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होईल की काय? असे सांगितले जात आहे. त्यामुळे या दोन्ही राष्ट्रवादीतील नेते काय प्रतिक्रिया देतील आणि काय निर्णय घेतील, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 07, 2026 11:49 AM
राहुल गांधींना घाबरून कार्यक्रमाला बदनाम करताय; विजय वडेट्टीवार....
राहुल गांधींच्या कार्यक्रमात परदेशी फंडिंग... बड्या नेत्याचं विधान
पुण्यात मध्यरात्री राडा, त्या मुलीचा व्हिडीओ आला समोर, माफीचं सत्य...
आमदार अपात्रतेबाबत मी... शिवसेना सुनावणीवर विधानसभा अध्यक्षांचं विधान

