Sharad Pawar | एसटीचा प्रवासी जास्त महत्त्वाचा, त्याचा विचार करावा! – शरद पवार

मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे.

मुंबई : मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय. तसंच कर्मचाऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं पवार म्हणाले आहेत. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

चंद्रकांत पाटलांकडून प्रश्नांची सरबत्ती

‘ST संपामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचे हाल होताहेत, हे सरकारला आत्ता समजलं? लाल परी धावत नसल्याने ग्रामीण भागातली प्रवास व्यवस्था लंगडी झालीये. त्याकडे लक्ष द्यायला शरद पवार यांना आजवर का वेळ झाला नाही? आजचा मुहूर्त होता? बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मनोरंजन केलं’, अशी टीका पाटील यांनी केलीय.

Published On - 8:44 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI