देशात सत्तेचा दुरुपयोग होतोय, रेल्वेचं प्रथमच खासगीकरण केलं जातंय : शरद पवार

दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता. नेहरुंनी पाया रचला. आज केंद्र सरकार काय करतंय? या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे. या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.  

महागाईमुळे जनता जेरीस आली आहे. नेहरुंनी विकासाचा पाया रचला मात्र आताचं सरकार काय करतंय? दीडशे वर्ष पारतंत्र्यात असणाऱ्या देशात विकास नव्हता. नेहरुंनी पाया रचला. आज केंद्र सरकार काय करतंय? या सरकारला रेल्वेची जागा विकून खासगीकरण करण्यात रस आहे. या देशात सुई तयार होत नव्हती, आता इथे रेल्वे तयार होतात. मात्र त्याची विक्री आणि खासगीकरणाचा घाट आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

शरद पवार म्हणाले, “अजित पवारांकडे सरकारी पाहुणे (आयकर छापा) आले होते. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. मलाही ईडीची नोटीस पाठवली होती. ज्या बँकेचे मी सदस्य नाही त्यावर मला नोटीस पाठवली. मला ईडी पाठवली लोकांनी त्यांना वेडी ठरवलं. सत्तेचा गैरवापर आजचे राजकर्ते करत आहेत. जनता यांना धडा शिकवेल, असं शरद पवार म्हणाले.

निवडणुकीच्या आधी मला ईडीची नोटीस दिली. मी बँकचा सभासदही नव्हतो. मला भाजपने ईडीची नोटीस दिली, मात्र लोकांनी भाजपला येडी ठरवली. आता  अजित पवारांकडे पाहुणे पाठवले, असं म्हणत शरद पवारांनी आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI