Sanajy Gaikwad On Sanjay Raut : ‘संजय राऊत यांना चभरेपणा करण्याची सवय’
मुख्यमंत्री शिंदे हे विधानसभेत कामावर बोलतात. आणि कमी बोलतात राऊत तुमच्यासारख पाणचट बोलत नाहीत. राऊत यांना चभरेपणा करण्याची सवय लागली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाच्या आमदार आणि मंत्र्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. यादरम्यान राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे हे विधानसभेत बोलताना गल्लीत असल्यासारखं बोलतात असं म्हटलं. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
गायकवाड यांनी राऊत यांना, यांना चभरेपणा करण्याची सवय लागल्याचे म्हटलं आहे. तसेच राऊत तुमच्या सारखं पाणचटपणा त्यांच्या भाषणात नसतो. ते कामावर बोलतात. आणि कमी बोलतात. त्याचबरोबर शिंदे यांच्या विधानभवनातल्या भाषणाने जनतेला भुरळ घातल्याचे देखिल गायकवाड म्हणाले.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

